Type Here to Get Search Results !

बिग ब्रेकिंग ;- लॉकडाऊन बाबत आरोग्य मंत्र्यांचे मोठे विधान...


लॉकडाऊन बाबत आरोग्य मंत्र्यांचे मोठे विधान...

टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत रूग्ण संख्येत वाढ झाली तर त्यावेळी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून विचार केला जाईल असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

लॉकडाऊन लागू केल्यानंतर होणारे आर्थिक परिणाम मोठे आहेत. त्यामुळे नागरिकांनी शासन, प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करावे.
कधीही लॉकडाऊन लागू होईल अशी अफवा सध्या आसपास पसरवली जात आहे. त्याला टोपे यांनी पूर्ण विराम दिला आहे.

जालना येथे काल रविवारी २९ नोव्हेंबर रोजी पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते.

               👇👇 Advertisement 👇👇
               ☝️☝️ Advertisement ☝️☝️

सध्या राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार राज्य शासनाचा नाही. यापूर्वी लॉकडाऊन लागू केल्यानंतर त्याचे आर्थिक परिणाम जाणवले आहेत.

राज्य अनलॉक केले आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून विचार केला जातो. कोरोनाच्या रूग्णसंख्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे नागरिकांनी सध्या शासन, प्रशासनाने कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करावे. सध्या राज्यात लॉकडाउन लागू होणार नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments