बेपत्ता झालेले पुण्याचे उद्योजक गौतम पाषाणकर यांच्याबाबत आली महत्त्वाची माहिती समोर...
पुणे :- पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा पोलिसांकडून युद्ध पातळीवर शोध घेतला जात असून, ते कोकणात असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथके केली असून कोकण विभागात त्यांचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल आहे. तर त्यांच्या मुलांनी काही जणांवर संशय व्यक्त करत पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान बेपत्ता झाल्यानंतर पाषाणकर हे पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग भागात एका नारळ-पाणी विक्रेत्याकडे दिसून आले होते. पण त्यानंतर ते कोठेच सीसीटीव्हीत दिसून आले नव्हते.कोठे पाहिले गेले ?
यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. या दरम्यान ते कोल्हापूर शहरात दिसून आल्याचे समोर आले होते. येथील एका हॉटेलमध्ये ते राहिले आहेत. ते सीसीटीव्ही पोलिसांना मिळाले. त्यांनी पाषाणकर यांच्या कुटुंबाला ते दाखविले. त्यावेळी त्यांनी देखील ते ओळखले आहे. त्यानुसार कोल्हापूर येथे गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. तसेच त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान पाषाणकर हे कोकणात गेले असावेत अशी शक्यता गृहीत धरून गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत. त्यानुसार त्यांचा या भागात शोध घेतला जात आहे. रत्नागिरी, कणकवली, गणपतीपुळे येथे पोलिस त्यांचा शोध घेत असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असे गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह यांनी सांगितले. पाषाणकर २१ ऑक्टोबर रोजी शहरातून बेपत्ता झाले आहेत.
Post a Comment
0 Comments