पुणे :- १२ नोव्हेंबर (गुरुवार) रोजी सकाळी ११:३० वाजता 'स्पंदन बहुभाषिक त्रैमासिकेचे प्रकाशन सोहळा शाहीन अकॅडमी कोंढवा खुर्द पुणे येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रोटी बँकेचे अध्यक्ष सिकंदर पठान हे होते. व प्रमुख पाहुणे म्हणून कवि दीपक करंदीकर, ऍड.सिकंदर शेख व शाहीन अकॅडमीचे प्राध्यापक बशीर काझी हे उपस्थित होते.
तसेच या शुभदिनाचे औचित्य साधून कोविड महामारीत योगदान देणारे कोवीड योद्धे, डाँक्टर, सफाई कामगार व पोलिस कर्मचारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथील ग्राफिक्स प्रकाशनचे संपादक इंतेखाब फराश यांनी केले होते.
Post a Comment
0 Comments