टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) :- राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी श्रीनाथ पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुज्जम्मील शेख यांनी दि.५ नोव्हेंबर (गुरूवार) रोजी दिले. पाटील यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष राहुल द्विवेदी, राष्ट्रीय सरचिटणीस अनिल दूत व युवक राष्ट्रीय अध्यक्ष ऋषी किलाम यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. त्यावेळी संघटनेचे पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीनाथ पाटील हे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अगदी जवळचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. व त्यांची उत्तर महाराष्ट्र विभागात चांगली ओळख व जनसंपर्क आहे.
Post a Comment
0 Comments