पुणे :- महापौर मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्यानं ते रूग्णालयात गेले होते. त्यांनी कोरोनाची तपासणी झाली आणि त्यांचा कोरोनाचा अहवाल (रिपोर्ट) पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना लोकडाऊनमध्ये त्यांनी त्याचे काम थांबवले नव्हते. पुण्याचे महापौर पदाची जबाबदारी असल्यानं सातत्यानं ते सर्वात पुढे होते. दरम्यानच त्यांना ताप आला आणि त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. अशी माहिती त्यांनी स्वतः ही माहिती ट्वीट करून दिली आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ ट्विट मध्ये...
थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड-19 टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत
असेल.उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहूल परिस्थितीचा आढावा घेत राहील.दरम्यान, पुण्याच्या महापौरांनाच कोरोना झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, वारंवार प्रशासन सर्व नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन करीत आहे. तरी देखील काहीजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लोकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश शुक्रवारी दिली आहेत.
त्याप्रमाणे पोलिसांनी कडक अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी रात्रीपासुन चौका - चौकातील बंदोबस्त रात्रीच्या वेळी वाढवण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments