भाजपाच्या माजी आमदारांना कोरोनाची लागण...
पुणे :- भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर हे करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी स्वतःट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. भाजपाच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रदेश कार्यकारिणीत योगेश टिळेकर यांना ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
काय म्हणाले ट्विट द्वारे
दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची COVID - 19 ची तपासणी करून घेतली असता तपासणी अहवाल पॉसिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे त्यांनी ट्विट केले आहे.
तसेच काल पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
Advertise Here 👇👇
Post a Comment
0 Comments