Type Here to Get Search Results !

आतापासून कोरोनाच्या चाचणीसाठी डॉक्टरांची चिट्टीची गरज लागणार नाही - आयसीएमआर





आतापासून कोरोनाच्या चाचणीसाठी डॉक्टरांची चिट्टीची गरज लागणार नाही - आयसीएमआर

पुणे :- करोना संशयित रुग्णाच्या चाचणीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) अनिवार्य करण्याची अट आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) शिथील करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने प्रसिद्ध केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचीमध्ये 'प्रिस्क्रिप्शन नको', या नव्या नियमाचा उल्लेख करण्यात आला आहे.

एखादा विशिष्ट आजार आपल्याला आहे किंवा नाही हे जाणून घेणे हा नागरिकाचा किंवा रुग्णाचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे त्याला चाचणी करायची असल्यास डॉक्टरांच्या चिठ्ठीची अट ठेवणे अनावश्यक असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे एखाद्या नागरिकाला करोना चाचणी करायची असल्यास डॉक्टरांकडे जाऊन चिठ्ठी घेण्याची सुटका झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देशात १,०४९ प्रयोगशाळांना करोना चाचणीची परवानगी देण्यात आली आहे.




                   Advertise Here 👇👇






                    Advertise Here ☝️☝️








Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.