Type Here to Get Search Results !

दौंड शहर १४ दिवसांसाठी कडकडीत बंद होणार...

दौंड शहर १४ दिवसांसाठी कडकडीत बंद होणार...

दौंड :- दौंड शहरात आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे, त्या दृष्टीने विचार करून दौंड शहर हे १४ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी दिली आहे. दौंड शहरात आणि तालुक्यात परिस्थिती हाताबाहेर गेली असुन, त्याला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
त्यानुसार दौंड, पुरंदरचे उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी आज हा आदेश जारी केला आहे.

काय काय राहणार चालू ?
१) अत्यावश्यक वस्तूंची किरकोळ विक्री सकाळी नऊ ते दुपारी एक ( ९ ते १ ) वाजेपर्यंत सुरू राहील.
२) घरपोच दूध विक्री सकाळी सहा ते नऊ ( ६ ते ९) वाजेपर्यंत सुरू राहील.
३) शासकीय आस्थापना सुरू राहतील.
४) प्रतिबंधित क्षेत्रात बँकिंग सुविधांसाठी सर्व बँकेची शाखा कार्यालय त्यांच्या कालावधीत सुरू राहतील.
५) कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करणारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी,
६) पोलीस प्रशासन,
७) राज्य व केंद्र सरकारचे कर्मचारी व वाहने, 
८) वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी व वाहने,
याव्यतिरिक्त इतर व्यक्ती, दुचाकी व चारचाकी वाहने प्रतिबंधित क्षेत्रात विनाकारण आल्यास कारवाई करण्याचे आदेश दौंड पोलीस यांना देण्यात आले आहे. तसेच त्याठिकाणी येण्यास व बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

                    Advertise Here 👇👇
                    Advertise Here ☝️☝️

Post a Comment

0 Comments