औदुंबर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गुरूपौर्णिमा निमित्ताने मिठाईचे वाटप...
पुणे शहरातील औदुंबर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ५ जुलै (रविवार) रोजी गुरू पौर्णिमा निमित्त गरजू व गरीब लोकांना बेसन लाडू, केळी, पिस्ता बर्फी व अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आले. पुणे शहरात शनी मंदिर, दक्षिण मुखी मारुती मंदिर, लाल महाल, रास्ता पेठ, गणेश पेठ या ठिकाणी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पावटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सचिन शहा, रमेश नायडू, सुमित बहिरमल, जतिन ञिवेदी व आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक औदुंबर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य पुणे शहर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नरेंद्र ज्ञानेश्वर पावटेकर हे होते.
तसेच काही दिवसांपूर्वीच औदुंबर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजूंना धान्य वाटप करण्यात आले होते.
व सतत सामाजिक कार्यात ही ट्रस्ट अग्रेसर असते.
Post a Comment
0 Comments