Type Here to Get Search Results !

औदुंबर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गरजूंना धान्य वाटप...

औदुंबर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गरजूंना धान्य वाटप...
औदुंबर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बुधवार दि ८ जुलै रोजी गरजू व गरीब लोकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले.
गणेश पेठ गुरुद्वाराजवळ, कसबा पेठ, रविवार पेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ या सर्व भागांमधील गरीब व गरजू लोकांना गहू, तांदूळ, हरभरा डाळ, साखर, हळद,गोडा मसाला, मीठ,कांदे असे १०,००० किलो जीवनावश्यक वस्तू व धान्यवाटप ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पावटेकर तसेच सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनासारख्या बिकट परिस्थितीत गरीब लोकांची गरज ओळखून ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते किट वाटपासाठी भर पावसात रस्त्यावर उतरले. यामध्ये प्रामुख्याने शरद दळवी, सचिन शहा, जतिन त्रिवेदी, श्रीकांत टिळेकर, रमेश नायडू, गणेश सावरकर, सिद्धेश बलवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संयोजक औदुंबर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नरेंद्र ज्ञानेश्वर पावटेकर हे होते.

Post a Comment

0 Comments