Type Here to Get Search Results !

राजस्थानमध्ये राजकीय हालचाली ; उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत...

राजस्थानमध्ये राजकीय हालचाली ; उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत...

मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळून काही महिने उलटले असतानाच आता तशीच परिस्थिती राजस्थानमध्ये उद्भवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तरुण तडफदार नेते सचिन पायलट २५ आमदारांसह दिल्लीत दाखल झाल्याची बातमी सध्याच्या ट्विटर ट्रेंडिंगमध्ये चालली आहे. १२ तारखेच्या मध्यरात्रीपासूनच हा ट्रेंड पुढे जात असून रविवारी राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार का ? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यासोबतच भाजपकडून सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली गेली असल्याच्याही चर्चा आहेत. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीसुद्धा आमदारांशी चर्चा करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. कोरोना परिस्थितीचं कारण देत कुणीही राज्याबाहेर जाऊ नये तसेच बाहेरील कुणाला राज्यात यायला परवानगी देऊ नये असे स्पष्ट निर्देशही परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. यासंदर्भातील ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. ज्येष्ठांना वारंवार संधी देत तरुण कार्यकर्त्यांकडे आणि नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसच्या गोटातून बाहेर पडत असून मध्यप्रदेश पाठोपाठ काँग्रेस आता राजस्थानही गमावणार का? हा प्रश्न उभा राहिला आहे. सचिन पायलट यांनी २५ आमदारांना एका रिसॉर्टमध्ये २५ वेगळ्या खोल्यांमध्ये ठेवलं असून या आमदारांचं नक्की काय होणार हे सोमवारी समजू शकणार आहे.

Post a Comment

0 Comments