Type Here to Get Search Results !

Add

Add

महेश हांडे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष महेश हांडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.१२ जुलै रोजी वडगावशेरी मतदारसंघातील पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले व पुष्प देवून यांनी करोना माहामारीच्या काळात दिवसरात्र  केलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड, पोलिस निरीक्षक रविंद्र कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम ,पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते, पो.हवालदार - दिनकर लोखंडे, देविदास राऊत, वामन सावंत, प्रणिता माळी, जयश्री बागल व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष रूपेश गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष जावेद इनामदार, वडगावशेरी विधानसभेचे अध्यक्ष किरण खैरे, उपाध्यक्ष सुहास तळेकर, कार्याध्यक्ष सागर खांदवे पाटील, संघटक सचिव कुलदीप शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस अजय पवार, सचिन शितोळे, सनी वाडेकर, सचिन गायकवाड, प्रशांत अवघडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments