पुणे :- ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळीच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ आयोजित पहिले महिला काव्यसंमेलन व कवी शफी बोल्डेकर लिखित ई बुक 'आम्ही मराठी मुसलमान' या काव्यसंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन प्रा. मैनोद्दिन र. मुल्ला सदस्य ,महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती ,पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या एकदिवसीय कार्यक्रमात प्रकाशन समारंभ व पहिले महिला कवीसंमेलन अशा दोन सत्रात झाले .या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री अनिसा सिकंदर शेख (पुणे) यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणुन कवयित्री शबाना मुल्ला (मुंबई), कवयित्री दिलशाद सय्यद (अहमदनगर), कवयित्री जस्मिन शेख (सांगली) व आदी कवियत्री या कार्यक्रमात उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments