Type Here to Get Search Results !

रूग्ण हक्क परिषदेच्या वतीने वर्ल्ड डॉक्टर्स डे" साजरा...

रूग्ण हक्क परिषदेच्या वतीने वर्ल्ड डॉक्टर्स डे" साजरा...
दौंड : (प्रतिनिधी विशाल घिगे)- रूग्ण हक्क परिषदेच्या वतीने दरवर्षी १ जुलै रोजी मोठ्या उत्साहात "वर्ल्ड डॉक्टर्स डे" साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाचे जागतिक संकट असल्याने या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व डॉक्टरांचा सन्मान करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला होता.
बुधवार दि. १ जुलै रोजी संघटनेच्या वतीने केडगांव औट पोस्ट येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे साहेब, यवत पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे अधिकारी सुजीत जगताप, हवालदार जितेंद्र पानसरे, बाळासो चोरमले साहेब, संपत खबाले, विशाल जाधव, तसेच पोलीस मित्र सचिन गायकवाड, निलेश देशमुख आदींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात डॉ.संदीप देशमुख, डॉ.सौ.राजश्री देशमुख, डॉ.किशोर कांबळे यांना देखील सन्मानित करण्यात आले. केडगाव मधील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर केडगांव परिसरातील सर्व डॉक्टरांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
तसेच संस्थापक अध्यक्ष उमेशजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य दौंड तालुक्यात जोमाने वाढेल असे रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने परिषदेचे कार्यकर्ते निलेश मेमाणे यांनी सांगितले.
सन्मानित करण्यात आल्यानंतर पोलीस व डॉक्टरांनी सांगितले की समाजातील तुमच्यासारखे काही घटक कौतुकाची थाप जेव्हा आमच्या पाठीवर टाकतात त्यावेळी वेगळीच ऊर्जा आमच्या शरीरात संचारते. तुमच्या कार्यास शुभेच्छा म्हणत रुग्ण हक्क परिषदेचे आभार मानले.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे कृष्णा जाधव, मुन्ना शिंदे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments