Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुनील गव्हाणे व मराठवाडा विभाग प्रमुखपदी प्रशांत कदम यांनी निवड...

राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुनील गव्हाणे व मराठवाडा विभाग प्रमुखपदी प्रशांत कदम यांनी निवड...
पुणे :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची नियुक्ती (शुक्रवार) ३१ जुलै रोजी करण्यात आली. नवनियुक्त सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनीया दुहान तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि जावेद ईनामदार उपस्थित होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सुनील विजय गव्हाणे यांची तर उपाध्यक्षपदी आणि पश्चिम महाराष्ट्रच्या विभाग प्रमुखपदी सुहास विजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

पुणे विभाग प्रमुखपदी संध्या उद्धव सोनावणे, कोकण विभाग प्रमुखपदी किरण गोरखनाथ शिखरे, मराठवाडा विभाग प्रमुखपदी प्रशांत कैलाश कदम, अमरावती विभाग प्रमुखपदी अविनाश सत्येंद्रनाथ चव्हाण, नाशिक विभाग प्रमुखपदी चिन्मय अविनाश गाढे, नागपुर विभाग प्रमुखपदी आशिष प्रकाश आवळे यांची तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आयटी विभाग प्रमुखपदी जितेश सुरेश सरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments