Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

भाजपचे ४० आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या विधानाने खळबळ...

भाजपचे ४० आमदार आमच्या महाविकास आघाडीच्या संपर्कात राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या विधानाने खळबळ...

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा दावा विरोधी पक्ष भाजपमधून करण्यात येतोय. त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वारंवार सत्तेतील नेत्यांना सांगावं लागतंय. दरम्यान भाजपातील ४० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. फुटणाऱ्या ४० आमदारांची यादी तयार असल्याचेही ते म्हणाले. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलींय. बच्चू कडुंचे हे विधान खरं ठरणार असेल तर हे आमदार कोण असतील ? यावर चर्चा सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस सक्षम विरोधीपक्ष नेता असल्याचे कबुल करतील तेव्हा भाजपातील ४० आमदार फुटतील असा दावाही बच्चू कडू यांनी केलाय. 

तसेच महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून विरोधी पक्षच अस्तिर असल्याचा खुचक टोला राज्यमंत्री बच्चू कडू भाजपाला लावला. पुढील ५ वर्षे महाविकास आघाडीचं सरकार स्थिर राहील असेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments