भारतात कोरोना पेक्षाही धोकादायक आजाराची एन्ट्री, गुजरातमध्ये सापडला पहिला रुग्ण...
आतापर्यंत देशातील लोक कोरोना विषाणूमुळे त्रस्त झाले होते, आता कोरोना विषाणूपेक्षा अधिक धोकादायक रोग देशात आला आहे. या बातमीने सगळेच चिंतेत आले आहेत. गुजरातमधील सुरतमध्ये या आजाराची पहिली घटना आढळली असून सूरतमधील एका लहान मुलामध्ये या आजाराची लक्षणे दिसून आल्याचे सांगितले जात आहे.
या देशात आढळतो हा आजार...
या आजाराचे नाव मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (Multisystem Inflammatory Syndrome) असे आहे. याला MIS-C असेही म्हणतात. या धोकादायक आजाराचा पहिला रूग्ण आढल्यानंतर सूरत आणि गुजरातमधील लोकांची चिंता अधिक वाढली आहे. MIS-C म्हणजेच मल्टी सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमची लक्षणे सूरत येथे राहणाऱ्या कुटूंबाच्या दहा वर्षांच्या मुलाच्या शरीरात दिसून आली आहेत.
कुटुंबाने त्यांच्या मुलाला सूरतच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या लहान मुलाला ताप असून उलट्या, खोकला, अतिसार होत आहे. तर त्याचे डोळे आणि ओठ लाल झाले असल्याचे सांगितले जात आहे. सुरतचे डॉ. आशिष गोटी यांनी मुलाला तपासल्यानंतर त्यांनी सूरत आणि मुंबईतील इतर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले. जेव्हा मुलाचा तपासणी रिपोर्ट आला तेव्हा असे आढळले की, मुलाच्या शरीरात मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमची लक्षणं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या धोकादायक रोगासह झगडणाऱ्या या मुलाच्या हृदयाचे पंपिंग ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्याच्या शरीरातील नसा सुजल्या आहे. यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. परंतु सात दिवसांच्या उपचारानंतर त्याला घरी पाठविण्यात आले. परंतु हा रोग देशात पसरण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.
तर कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक आजार ठरू शकतो...
३ वर्ष ते २० वर्षे वयोगटातील पौगंडावस्थेतील मुले या आजाराच्या विळख्यात येऊ शकतात. मुलांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच कोरोनासारखा हा आजार वाढला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले आहे. MIS-C पासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याची लक्षणे लक्षात ठेवणे. मुलाला ताप, उलट्या, अतिसार, डोळे आणि ओठ लाल झाल्याचे दिसताच मुलाला ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे. यासाठी योग्य उपचार आहेत परंतु वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तो कोरोनापेक्षा अधिक धोकादायक आजार ठरू शकतो.
Post a Comment
0 Comments