पुणे :- संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेला गेलेला सत्यशील शेरकर विरुद्ध अक्षय बोऱ्हाडे हा वाद अखेर मिटला आहे. दोन्ही बाजूंनी सामोपचाराने माघार घेत परस्पर सहमतीनं या वादावर पडदा टाकला. शिवजन्मभूमीची बदनामी नको, या एकाच कारणामुळे हा वाद मिटल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावातील ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला आणि बैठक घेऊन हा वाद गावातल्या गावात निकाली काढला.
नेते मंडळींची अहम भूमिका :-
जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी याप्रकरणी मोलाची भूमिका बजावल्याचं समोर आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्रशासनावर आधीच तणाव असताना आता या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. दरम्यान, हे प्रकरण मिटवण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील प्रयत्न केल्याचं कळतंय. तसेच सूरज वाजगे , गणेश कवडे, जालिंदर शिंदे, प्रदिप कंद, सनी निम्हण यांचीही प्रमुख भूमिका असल्याचं कळतंय.
बोऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन समाज माध्यमात व्हायरल केलेल्या व्हिडीओ मुळे संपुर्ण राज्यात या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवजन्मभुमी विषयी होत असलेल्या चर्चेस पुर्ण विराम मिळावा व घरातले भांडण घरातच मिटले पाहिजे या हेतुने आमदार बेनके यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दोघांमध्ये चर्चा घडवून आणली.
शिवछत्रपतींचे नाव सहानुभूतीसाठी वापरून फसवले...
दरम्यान, अक्षय बोराडेने शिवप्रेमी आणि सोशल मीडियातील सर्वसामान्य लोकांना शिवछत्रपतींचे नाव सहानुभूतीसाठी वापरून फसवले. या प्रकरणातील अक्षय बोऱ्हाडे हा तरूण गुन्हेगारी टोळीशी परिचित असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. हा मुलगा गुन्हेगारी टोळीशी परिचित आहे, हे ऐकलं होतं. पण त्याच्या कालच्या लाईव्ह वरून आता सिद्ध झालं, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
बाबाराजे काय म्हणाले ? :-
हा वाद मिटल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बाबाराजे देशमुख हे देखील अक्षय बोऱ्हाडे याच्यावर चांगलेच भडकले आहे. ‘अक्षय बोऱ्हाडे याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याचं नावं वापरून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पण जर आम्हाला कळालं की अक्षय चुकीचा आहे, त्याने हे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं आहे. तर अक्षय तुला आम्ही माफ करणार नाही. आज तुझ्यामुळे तमाम शिवभक्तांना मान खाली घालावी लागली आहे. पण तु शिवभक्त आहेस म्हणून आम्ही तुला पाठींबा द्यायला आलो.’ अस बाबाराजे देशमुख म्हणाले आहेत.
तर, पुढे देशमुख यांनी अक्षय बोऱ्हाडे याच्यावर होणाऱ्या आरोपांचा पाढा वाचत त्याला थेट इशारच दिला आहे. “ लोक तुझ्यावर टीका करत आहेत. अवयवांची तस्करी करत असल्याचा आरोप करत आहते. त्यामुळे तु लोकांच्या भावनेला ठेस पोहचू देऊ नकोस. तुझ्यावरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध करून दाखव. नाहीतर तु जर चुकीचा असशील तर तुला सुट्टी नाही, तुझा बाजार झालाच म्हणून समज.” असा बाबाराजे देशमुख यांनी घेतला आहे.
दरम्यान, बाबाराजे देशमुख यांनी सत्यशील शेरकर यांना देखील अक्षय वरील आरोप सिद्ध करून दाखवण्याचे आवाहन केले आहे. अन जर बोऱ्हाडे वरचे आरोप सिद्ध झाले तर शिवभक्त त्याला जुन्नरमध्ये येऊन उलटा टांगून मारतील असा सज्जड दम देखील देशमुख यांनी दिला आहे.
३ एकर जमीन, दुकान, वडिलांच्या नोकरीमध्ये सेटलमेंट केल्याचा आरोप...
अक्षय बोऱ्हाडे याला ३ एकर जमीन दिली जाणार असून त्याचा असणारा पत्र्याचा शेड तसेच दोन दुकाने ग्रामपंचायतकडून अधिकृत करण्यात येणार असून शेरकारांच्या कारखान्यात असणारे अक्षयच्या वडिलांची नोकरी देखील शाबूत राहणार असल्याचे खुद्द अक्षय बोऱ्हाडे याने फोनवर सांगितल्याचा दावा बाबाराजे देशमुख यांनी केला आहे.
Post a Comment
0 Comments