Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

दौंड तालुक्यात शिवराज्याभिषेक दिना निमित्त रक्तदान शिबीर...






दौंड :- (प्रतिनिधी विशाल घिगे) - कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील ब्लड बँक मध्ये रक्तसाठा कमी असल्या कारणाने तसेच शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने प्रशासनाच्या नियमांचे पालन करून (रविवार) ७ जुन २०२० रोजी शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि समस्त ग्रामस्थ पारगांव यांच्या संकल्पनेतून दौंड तालुक्यातील पारगांव (सा.मा) येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.


सर्व रक्तदात्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवुन संजीवनी रक्तदपेढी या ब्लड बँकेला एकुण १६० ब्लड बॅगचे कलेक्शन करून दिले, वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्षात घेऊन सर्व मित्र परिवार आणि समस्त ग्रामस्थ पारगांव यांनी रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार संयोजकांच्या वतीने करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सहकार महर्षी पोपटभाई ताकवणे, परगावचे नवनिर्वाचित उपसरपंच हनुमंत वसव, मा.सरपंच रा.वि.शिशुपाल, विजय शिवरकर, महेश शेळके, राहुल टिळेकर,सोमनाथ ताकवणे,आयोजक सागर शेलार, संतोष सोनवणे आणि पारगाव रक्तदाते ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments