दौंड : (प्रतिनिधी विशाल घिगे) : चौफुला याठिकाणी दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.
१० जून रोजी २१ व्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिना निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत दौंड तालुक्यात चौफुला याठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
Advertising
Advertising
यामध्ये ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला आहे. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वैशालीताई नागवडे, दौंड तालुका युवक अध्यक्ष विकास खळदकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष अजित शितोळे, दौंड तालुका विचार मंच अध्यक्ष संदीप पाटील खळदकर, उद्योजक राजेंद्र दबडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष माऊली खळदकर, राष्ट्रवादी जिल्हा समन्वयक अनिल नागवडे, निलेश माळवदकर, महेश इंगळे, व आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments