पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. पडळकरांच्या या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्ठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
"पवार हे राज्याला लागलेले कोरोना आहे अशी विखारी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली."
त्यांच्या टीकेचा समाचार घेत पुण्याचे राष्ट्रवादीचे मा.उपमहापौर दीपक मानकर यांनी पडळकरांवर निशाणा साधला आहे. त्यांनी सांगितले की, पवार साहेबांबद्दल बोलण्याची आपली लायकी आहे का? तुमची क्षमता नाही आणि तुमची लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही. "पवार साहेब हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दैवत आहे अन त्या दैवता विषयी कोण्ही बोलत असेल तर आम्ही तुमची लायकी दाखवुन देऊ."
पुण्यात राष्ट्रवादी करणार आंदोलन :
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवून करतील, असे अंकुश काकडेंनी स्पष्ट केलं.
Post a Comment
0 Comments