सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अग्निशामक दलातील जवानांना सोडियम क्लोराइड जंतुनाशक किटचे वाटप...
पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुणे शहरात खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अग्निशामक दलातील जवानांच्या सुुरक्षितेसाठी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोडियम हायपो क्लोराईड या जंतुनाशक द्रव्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, पुणे शहराध्यक्ष महेश खांडे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर उपाध्यक्ष रुपेश गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर सरचिटणीस अजय पवार, शिवसेना शाखाप्रमुख शुभम दुगाने, शांतता कमिटी सदस्य सलीम पठाण व आदी मान्यवर उपस्थित होते. व तसेच या कार्यक्रमाचे सर्वस्वी आयोजन राष्ट्रवादी युुवक काँग्रेसचे पुणेे शहर उपाध्यक्ष जावेद इनामदार व सिद्धार्थ ढोले पाटील यांनी केले होते.
Advertise Here 👇👇
Advertise Here ☝️☝️
Post a Comment
0 Comments