Type Here to Get Search Results !

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पहिल्यांदा ऑनलाईन कवी संमेलन...






शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पहिल्यांदा ऑनलाईन कवी संमेलन...


दौंड -:(प्रतिनिधी विशाल घिगे): कोरोना या आजारामुळे सध्या संचारबंदी व जमावबंदी कायदा संपुर्ण महाराष्ट्रात लागु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पहिल्यांदाच ऑनलाईन कवी संमेलन ७ जून रोजी संध्याकाळी ९ वाजता थाटात संपन्न झाले. हे असे ऑनलाईन पद्धतीचे कवी संमेलन महाराष्ट्रात पहिलेच ठरले आहे.


या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी बुलढाणा येथील सुप्रसिद्ध कवी.बी.एल.खान होते. कवी संमेलनाचे उदघाटन युवा साहित्यिक खाजाभाई बागवान यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कवी.इकबाल रसुलसाब उपस्थित होते.कवी संमेलन अध्यक्षांनी स्वागतपर कविता गाऊन कविसमेलनाची सुरवात केली व उदघाटन पर कवी.खाजाभाई बागवान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारी कविता सादर करून सुरुवात केली.


       पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका येथील प्रसिद्ध कवयित्री अनिसा शेख यांनी "दैवत छत्रपती" ही कविता सादर केली. सिंधुदुर्ग येथील कवी रघुनाथ राजापूरकर यांनी प्रेम भाव व्यक्त करणारी कविता सादर केली तर उस्मानाबादचे कवी बिभीषण गिरी यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी कविता सादर केली. कवयित्री माणिक नागावे यांनी शिवार ही कविता सादर केली. तर कवी दत्ता पेंदारे यांनी भाकर कविता सादर करताना भाकरीचे महत्व पटवून दिले. कवी.जाकीर तांबोळी यांनी निसर्गावरची कविता सादर केली. तर कवी फिरोज बागवान यांनी तिळे ही हास्य कविता सादर केली. या संमेलनात कवी लक्ष्मण जाधव(पंढरपूर), प्रसिद्ध कवी.विजय लुल्हे(जळगाव) यांनी कोरोना विषयक कविता सादर केली. कवी.अहमद शेख(बसमत) यांनी गीत गाऊन सर्वांची मने जिंकली तर कवी सुयश चव्हाण यांनी अप्रतिम कविता सादर केली. संमेलनाच्या समारोपावेळी अध्यक्षांनी दारुड्याची शाळा ही हास्य कविता सादर केली. या कविसमेलनाची सूत्रसंचालन कवी.शेख शफी बोल्डेकर यांनी केले तर आभार कवी.जाकीर तांबोळी यांनी मानले.


Post a Comment

0 Comments