Type Here to Get Search Results !

दौंड तालुक्यातील केडगाव मध्ये खाजगी डॉक्टरांना कोरोनाची लागण..

दौंड - (प्रतिनिधी विशाल घिगे)- दौंड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या केडगाव येथील एक खाजगी डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील व दौंड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक रासगे यांनी दिली आहे.
केडगाव ही दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून येत होते. या गर्दीवर प्रशासनाचे कुठलेही निर्बंध नव्हते.
येथील मुख्य बाजारपेठेत एका खाजगी डॉक्टरांचे हॉस्पिटल आहे. येथे दररोज या डॉक्टरांकडून ओपीडी घेतली जाते. कोरोनाची कुठल्याही प्रकारची लक्षणे नसताना केवळ मनामध्ये शंका आल्याने संबंधित डॉक्टरांनी लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात आपली कोरोना तपासणी केली. दुर्दैवाने या डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल आज पॉझिटिव्ह आला असल्यामुळे केडगावकरांची धाकधूक वाढली आहे.केडगाव ग्रामस्तानी सतर्क राहण्याची गरज आहे असे दौंड आरोग्य विभागाने सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments