अजमेरचे सुफी संत ख्वाजा साहेबांना लुटेरे संबोधल्याबद्दल अमीष देवगण विरोधात देशभरात एफआयआर दाखल......
आपल्या विवादास्पद शोबद्दल चर्चेत असलेले News 18 चे अँकर अमीश देवगन जगातील प्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती ऊर्फ गरीब नवाज यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य करणे महागडे ठरले आहेत.
मुस्लिम समाजाचे भावना भडकले...
अमिश देवगणविरोधात देशभरात एफआयआर दाखल होत आहे. व मुस्लिम समाज व ख्वाजा साहेबांना मानणाऱ्या वर्गाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. व तसेच twitter या वेबसाईटवर #ArrestAmishDevgan अश्या पद्धतीने ट्रेंड चालविण्यात सुरुवात झाली आहे.
आपल्या मथुरा-काशीशी संबंधित एका कार्यक्रमादरम्यान अमीश देवगणने हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती उर्फ गरीब नवाज यांना चिश्ती लुटेरे असे नावाने संबोधले . धर्मांतरणाच्या मुद्दय़ावर ते म्हणाले होते की चिश्ती दरोडेखोर आले आणि त्यानंतर लोकांनी धर्म बदलला.
यावेळी त्यांनी अनेक वेळा हे वाक्य पुन्हा पुन्हा सांगितले.
त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
संपुर्ण देशभरात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल...
त्यानंतर त्याच्याविरोधात देशातील विविध भागात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री अजमेर, मुंबई, नांदेड, पुणे, औरंगाबाद, भोपाळ, भीलवाडा, बरेली, जयपूर यासह अनेक शहरांमध्ये गुन्हे दाखल झाले.
असा विश्वास आहे की उद्या अमिश देवगणविरोधात आणखी बऱ्याच शहरांत गुन्हे दाखल होतील.
अमिश देवगण यांनी दिले स्पष्टीकरण...
तथापि, वाद वाढताच अमीश देवगण यांनी आपले विधान स्पष्ट केले की "माझ्या पहिल्या चर्चेत मी अनवधानाने 'खिलजी' यांना चिश्ती असा उल्लेख केला. या गंभीर चुकांबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांचा मी आदर करतो त्या सूफी संत मोइनुद्दीन चिश्ती यांच्या अनुयायांना वाईट वाटेल. मी त्याच्या मंदिरात यापूर्वीच त्यांचा आशीर्वाद मागितला आहे. या चुकीबद्दल मला दिलगिरी आहे.
अश्या या चुकीच्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनुयायी यांची नाराजी दिसुन येत आहे.
Verry nice
ReplyDelete