Type Here to Get Search Results !

केडगाव मध्ये कोरोनाचे आणखी 3 रुग्ण पॉझिटिव्ह...

केडगाव मध्ये कोरोनाचे आणखी 3 रुग्ण पॉझिटिव्ह...
दौंड - (प्रतिनिधी विशाल घिगे) - दौंड तालुक्यातील केडगाव येथील कोरोणा बाधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या 3 नातेवाईकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसांपूर्वी केडगाव बाजार पेठेतील एका डॉक्टरांना कोरोनाची लक्षणे आढळल्या नंतर त्यांच्या नातेवाईकांचे स्वेब टेस्ट घेण्यात आले होते, यापैकी तीन नातेवाईक हे पॉझिटिव्ह आले असून खबरदारी म्हणून प्रशासनाने केडगाव मधील अंतर्गत रस्ते बंद केले आहेत. तसेच अजून एका डॉक्टरांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक राजगे यांनी दिली. केडगाव परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 झाली आहे.

Post a Comment

0 Comments