सर्वात मोठी बातमी:अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भुकंप; माजी मंत्री राम कदम यांचे भाजपचे 1 नगराध्यक्ष, 10 नगरसेवक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश...
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह दहा नगरसेवक आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे. जामखेडमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे दाखवुन दिले.
यापूर्वी घायतडक यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवकपदाचा राजीनामा देणार म्हणून अशीच पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याकरिता घेतलेली पत्रकार परिषद नेमकी कोणत्या वळणावर जाऊन पोहोचते.
हे येणारा काळच दाखवून देईल.
गुपचुप बैठका सुरू...
जामखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी मागील आठवड्यात राजकीय दबावापोटी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते.
त्याच वेळी अन्य 10 नगरसेवकांनी आपल्याकडे नगरसेवक पदाचे राजीनामे दिलेले आहेत, असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर अनेक राजकीय बैठका गुप्तगू होऊन अखेर हे राजीनामानाट्य पक्षांतराच्या वळणावर जाऊन पोहोचले.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली करणार प्रवेश...
नगराध्यक्ष घायतडक यांच्यासह दहा नगरसेवक दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केली. त्यामुळे तूर्तास राजीनामा नाट्यावर पडदा पडला अाहे. नव्याने पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. नगराध्यक्ष घायतडक यांच्यासह हे सर्व नगरसेवक माजी मंत्री राम शिंदे यांचे समर्थक होते.
राम कदम यांच्या सत्तेला सुरुंग...
यापैकी बहुतांशी नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले होते. मात्र, त्यांनी माजी मंत्री सुरेश धस यांची साथ सोडून माजी मंत्री राम शिंदे यांची साथ धरली होती. मात्र यावेळी नगराध्यक्ष निखिल घायतडक यांना माजी मंत्री राम शिंदे यांच्याकडून राजीनामा देण्याच्या सूचना प्राप्त झाल्याने घायतडक यांनी राजीनामा देण्याएेवजी गुगली टाकून भाजपाची साथ सोडून अन्य दहा नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांचे नगराध्यक्षपद कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
राम शिंदे यांच्या सत्तेला सुरूंग आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षांसह 10 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दिवसात प्रवेश करणार असल्याने माजी मंत्री राम शिंदे यांच्या हाती सत्तेची सूत्रे असलेल्या जामखेड नगरपालिकेच्या राजकारणाला 'सुरुंग' लावला आहे.
Post a Comment
0 Comments