दौंड प्रतिनिधी - विशाल घिगे: दौंड तालुक्यातील खुटबाव येथील पंचवीस वर्षीय तरकारी मालाची वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दौंड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक राजगे यांनी दिली.
खुटबाव आणि गलांडवाडी शिव येथील राहणार 25 वर्षीय तरुण एका तरकारी मालाची वाहतूक करणाऱ्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. गेल्या दहा ते बारा दिवसापासून त्याची गाडी बंद होती. मात्र शुक्रवार दिनांक 12 रोजी त्याला हृदयाचा त्रास होऊ लागल्याने लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तेथेच त्याची तपासणी करण्यात आली. आज त्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून संबंधीत तरुण हा कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्याच्या संपर्कांत आलेल्या सहा जणांची देखील कोरोनाविषाणू ची तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ.रासगे यांनी सांगितले. दौंड तालुक्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून शासनाच्यावतीने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन डॉ. रासगे यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments