पुणे : कोरोना सारख्या महामारीच्या संकटानं देशासह संपूर्ण जगाचं कंबरडं मोडलय. यात बळीराजा तर कोलमडलाय. यातच आता त्याच्यासमोर टोळधाडीसारखं महाभयानक संकट उभं ठाकलंय. टोळधाडीचं हे संकट साधसुधं नसून त्याचं नुसतं नाव जरी एेकलं तर शेतकऱ्याच्या उरात घडकी भरते. आता हे संकट महाराष्ट्रातील विदर्भात पोहोचलंय. टोळधाड आली म्हणजे शेतच्या शेतं नष्ट होतात आणि त्यात शेतकरी पुरता भरडला जातो. टोळधाडीचा थवा उभ्या पिकाचा डोळ्यादेखत फडशा पाडताना बळीराजाला नुसतं त्यांच्याकड पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. परंतु नुसत्या नावानं धडकी भरविणाऱ्या या टोळधाडीबद्दल अनेकांना खूप कमी माहिती आहे.
उभ्या पिकाला उधवस्त करणारी टोळ धाड म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो.
संपूर्ण जगाला धोका
एफएओचे वरिष्ठ टोळधाड अंदाज अधिकारी केथ क्रेसमॅन यांच्या मते, वाळवंटीय टोळ ही चिंताजनक कीड असून याचा धोका संपूर्ण जगाला आहे. त्यामुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते.
खरचं असं झालं तर कोरानापेक्षा महाभयान संकटाला जगाला सामोरं जावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व आफ्रिकेतील टोळधाडीचं उग्र रुप पाहून ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी विनाशकारी समस्या असल्याचं मत संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवता विभागाचे प्रमुख मार्क लोकाक यांनी व्यक्त केलं होतं. पूर्व आफ्रिकेतून वाळवंटीय टोळचा शिरकाव भारत आणि पाकिस्तानात जूनमध्ये होईल, असा इशारा नुकताच एफएओने दिला होता. हा इशारा आता खरां ठरलाय.
महाराष्ट्रात तर रब्बी हंगामात टोळधाडीच्या प्रादुर्भावाची शक्यता काही जाणकारांनी वर्तवली होती. मुबलक पाऊस पडून सर्वत्र हिरवळ पसरते, त्यावेळी टोळधाडीचा उद्रेक होत असतो, हा जगभरातील अनुभव आहे. त्यामुळंच देशात जून-जुलैमध्ये चांगल्या पाऊसमानानंतर ही टोळधाड धुडगूस घालते. परंतु, राज्यात वेळेआधीच मे मध्ये टोळधाडीचं महासंकट दाखल झालय. पाकिस्तानातून राजस्थान - गुजरात - मध्यप्रदेश मार्गे ही टोळधाड आपल्या राज्यातील अमरावती, वर्धा जिल्ह्यासह नागपुरातील काटोल आणि कळमेश्वर तालुक्यात देखील येऊन धडकलीय. त्यामुळं कोरोना लॉकडाउनने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता टोळधाडीला नियंत्रणात ठेवण्याचं एक नवं आणि अत्यंत कठीण आव्हान उभं राहिलंय.
५८ वर्षांनंतर भारतावर महासंकट
भारतात गेल्या शंभर वर्षात प्रत्तेक वेळी पाच ते सात वर्षे टिकणाऱ्या दहाटोळ धाडींची नोंद आहे. त्यातील अगदी अलीकडची धाड १९५९ ते १९६२ या काळातील होती. १९६२ नंतर आता म्हणजे २०२० मध्ये ती पुन्हा नागपुरला आल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेरिक्चलर ऍण्ड बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेंट रिसर्चचे (सीबीएसआर) संचालक डॉ. मनोज रॉय यांनी दिली.
संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणे आहे :-
संपर्क - मुख्य संपादक मुज्जम्मील शेख - ७५०७७३७३१३
Post a Comment
0 Comments