Type Here to Get Search Results !

पुणे व मुंबईतील लॉकडाउन वाढणार याबाबत झाला निर्णय : अधिकारीही लागले कामाला...








कोरोनाच्या रुग्णांची पुणे आणि मुंबईतील वाढती संख्या लक्षात घेता किमान या दोन शहरांसाठी लॉकडाउन वाढणार असल्याचे राज्य सरकारमधील वरिष्ठ सूत्रांकडून गुरुवारी रात्री स्पष्ट झाले. कंटेन्मेंट झोनमध्ये कडक निर्बंध करतानाच उर्वरित भागात आणखी शिथिलता कशी देईल, यावर सध्या विचारविनिमय सुरू असल्याची माहिती आहे.

बड्या नेत्यांमध्ये झाल्या चर्चा...

राज्यात आज सर्वाधिक म्हणजे २५९८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच एका दिवसांत मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ८५ पेक्षा जास्त झाली आहे. पुण्यातही ३१८ रुग्ण एका दिवसांत सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकाची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार तसेच प्रमुख मंत्री यांची गुरुवारी चर्चा झाली. त्यात या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. लॉकडाउनबाबत केंद्र सरकारने काहीही निर्णय घेतला तरी, राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आपण दिशा ठरविली पाहिजे, यावर बैठकीत एकमत झाले.

मुंबई- पुणे पॅक ठेवण्यात येणार अधिकारी लागले कामाला... 

या पार्श्वभूमीवर पुुणे आणि मुंबईत किमान 15 दिवसांपुरता कायम ठेवायचा. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर शिथिलता वाढवायची, असे नियोजन प्रशासकीय अधिकाऱ्यांना करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. राज्यात कोरोनाचा उद्रेक विशिष्ट शहरांत झाला आहे. त्यामुळे तेथे शिथिलता देऊन मुंबई- पुणे पॅक ठेवण्यात येणार आहे.

उद्योग व व्यावसायिक यांचा विचार...

कंटेन्मेंट झोन सध्या या दोन शहरांतच आहेत. त्यामुळे तेथे या बाबतच्या उपाययोजना आवश्यक आहे. त्याचबरोबर कंटन्मेंट झोनच्या बाहेर व्यवसाय - उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अनेक व्यावसायिक आता आर्थिक अडचणीत आले आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबतही सकारात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे, असाही सूर या बैठकीत उमटल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.





संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणे आहे :-

संपर्क - मुख्य संपादक मुज्जम्मील शेख - ७५०७७३७३१३

Post a Comment

0 Comments