Type Here to Get Search Results !

दौंड मध्ये राजमुद्रा प्रतिष्ठान तर्फे सॅनिटायझर फवारणी करण्यात आली...
दौंड मध्ये राजमुद्रा प्रतिष्ठान तर्फे सॅनिटायझर फवारणी करण्यात आली...


दौंड : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आपलं गाव सोडुन विविध शहरांमध्ये काम करणारी काही मंडळी आपआपल्या गावाला परतली आहेत. मात्र या लोकांमुळे गावातील ग्रामस्थांना कोरोना विषाणुची लागण होऊ नये, तसेच गावातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दौंड शहरामधील कोरोना विषाणुशी लढण्यासाठी राजमुद्रा प्रतिष्ठाण दौंड शहर व तालुका मित्र परिवारा कडून श्री स्वामी समर्थ मंदिर, गजानन महाराज मंदिर, जनता कॉलनी परिसर, बंगला साईड परिसर , पदमावती नगर, राजधानी हॉटेल जवळील परिसर येथे सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.यावेळीस राजमुद्रा प्रतिष्ठाण दौंड शहरचे अध्यक्ष पंकज नंदखिले, उपाध्यक्ष मयूर भोसले, रितेश घोडेराव, विकी थोरात, स्वप्नील पोटघन, महादेव कोंजारे व मित्र परिवार उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments