Type Here to Get Search Results !

पुण्यातील उद्योग व कारखाने सुरु करण्याचे आदेश : जिल्हाधिकारी नवल किशोर राम




पुणे - लॉकडाऊन चालू असताना पुणेकरांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी - चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योगांना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील कारखाने बंदच राहणार आहेत. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील उद्योग, कारखाने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.


त्यामुळे जिल्ह्यातील उद्योग सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उद्योग सुरु करण्यासाठी कोणतीही परवानगी लागणार नसल्याचे म्हटले आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील कोणत्याही उद्योगांना पासेसची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील, कामगार आणि कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, तसेच त्यांना प्रवासही करता येणार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.


तसेच उर्वरित क्षेत्रातील कामगारांना कामावर जाण्याची परवानगी असेल, नंतर त्यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे. उद्योगांनी कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी असं जिल्हाधिकारी म्हणाले. मात्र, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सरकारच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र सोडून सर्व व्यवसायांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून बंद असणाऱ्या बाजापेठ उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Post a Comment

0 Comments