Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

शिक्षण बचाव मंचच्या देशव्यापी निषेध कृतीला एसएफआयचा जिल्ह्यातुन प्रतिसाद...




बीड ;- अखिल भारतीय सार्वजनिक शिक्षण बचाव मंचच्या वतीने लॉकडाऊन काळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवा, यासाठी देशभरात २० मे ला निषेध कृती करण्यात आल्या. यावेळी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारला पोहोचवण्यात आल्या. जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या तालुक्यात एसएफआयचे नेतृत्व, कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी, घराच्या परिसरात हातात पोस्टर पकडून आपल्या मागण्या मांडल्या. 



या कृतीतून पुढील मागण्या करण्यात आल्या. लॉकडाऊनच्या दरम्यान देशाच्या विविध भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सुरक्षित पोहोचवा. देशात बहुतांश विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाईन परीक्षा घेणे टाळा व ऑनलाईन लर्निंगसाठी दुसरी पर्यायी सर्वसमावेशी व्यवस्था करा. थकीत शिष्यवृत्ती, फेलोशिप व कमवा - शिका योजनेचे पैशे त्वरित वितरित करा. सर्व शैक्षणिक शुल्क रद्द करा. परदेशात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या फेलोशिपसाठी नव्याने लागू केलेली नॉन क्रिमिलिअर अट त्वरित रद्द करा. तरुणांना बेरोजगारी भत्ता द्या. सरकारी संस्थांचे खाजगीकरण बंद करा. विद्यापीठात काम करत असलेल्या कामगारांचे थकीत वेतन त्वरित द्या. यांसह अनेक मागण्या करण्यात आल्या. या कृतीमध्ये एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य सचिव सुहास झोडगे, जिल्हा सचिव लहू खारगे, संतोष जाधव, विजय लोखंडे , अंकुश कोकाटे, संयोगिता गोचडे, दत्ता सोळंके, बाबासाहेब गायकवाड, रामेश्वर जाधव, विद्या सवासे, विजय राठोड, अभिषेक शिंदे, रामेश्वर आठवले, शिवा चव्हाण, अश्विनी चव्हाण, हनुमान शिंदे, ज्योती दराडे, स्वाती घोडके, अशोक शेरकर, निकीता गोचडे, बालाजी कुंडकर विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.





संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणे आहे :-

संपर्क - मुख्य संपादक मुज्जम्मील शेख - ७५०७७३७३१३


Post a Comment

0 Comments