Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या कार्याला यश...




राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या कार्याला यश...


पुणे : सध्या संपुर्ण देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना आजाराची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.


त्यामध्ये राजस्थान मधील कोटा येथे लॉकडाऊनमूळे अडकलेल्या १७०० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या पाठपुराव्यामुळे यश मिळाले आहे.


धीरज शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून सातत्याने यासाठी पाठपुरावा केला होता.



महाराष्ट्र सरकारने राज्य परिवहन (ST) महामंडळाच्या ८० बसेस सोय उपलब्ध करून दिल्यामुळे हे काम अधिक सोपे झाले. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून, बसमध्ये सोशल डिस्टनसिंग नियमाचे पालन करून आणण्यात येत आहे. तसेच बस चालकांना मास्क आणि सॅनिटायझर देण्यात आले. धीरज शर्मा आणि सोनिया दुहन या कठीण परिस्थितीत कोटा येथुन सातत्याने सोबत आहेत.


या सर्व मोहिमेत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले असे धीरज शर्मा यांनी सांगितले.


त्यांनी केलेल्या या कार्याला विद्यार्थ्यांकडुन व त्यांच्या पालकांनकडून आभार मानले जात आहे.


मागे देखील मुख्यमंत्री निवडीच्या वेळीस धीरज शर्मा सोनिया धुहन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आमदार दिल्ली येथून मुंबईला आणले होते.


Post a Comment

0 Comments