१७ मे पर्यंत कायम राहणार लोकडाऊन...
पुणे : कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातलं आहे.
त्या कारणास्तव गेल्या अनेक दिवसांपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपणार आहे. मात्र, त्यापुर्वीच मोदी सरकारनं लॉकडाऊनची मुदत आणखी १५ दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना भारतीयांना करावा लागणार आहे.
आताच काही वेळापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी ३ मे नंतरच्या परिस्थितीची रणनीती आखली. आणि आत्ताच केंद्र सरकारनं आणखी १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार १७ मे पर्यंत लॉकडाऊन चालु राहणार असल्याची माहिती दिली आहे.
Post a Comment
0 Comments