Type Here to Get Search Results !

पुणे पोलिस दलातील २८ पोलिसांचा पोलिस महासंचालक सन्मान चिन्हाने होणार गौरव...







पुणे पोलिस दलातील २८ पोलिसांचा  पोलिस महासंचालक सन्मान चिन्हाने होणार गौरव...

पुणे : राज्याच्या गृह विभागाच्या वतीने दरवर्षी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह विजेते जाहीर केले जातात.

२०१९ या वर्षामधील पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांची नावे गुरुवारी ३० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली.

त्यामध्ये पुणे शहर पोलिस दलातील ४ पोलिस अधिकाऱ्यांसह २८ पोलिसांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी हे सन्मानचिन्ह प्राप्त पोलिसांची नावे जाहीर केली आहेत.

सन्मान चिन्ह मिळणाऱ्या अधिकाऱ्यांचे नावे पुढील प्रमाणे :

पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील आणि पोलिस निरीक्षक संतोष बर्गे यांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवा केल्याबद्दल पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

तसेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भरत मोरे, दिलीप पोटे, शशिकांत शिंदे, माणिक पवार, अशोक सणस, पोलिस हवालदार दिलीप मोरे, संतोष पागार, अस्लम आत्तार, महादेव निंबाळकर, विजय भोसले, विकास शिंदे, सुनील बोरकर, दिलीप वाळके, संतोष मोहिते, साक्षी मुळे, राहुल शिंदे, अतुल गायकवाड, सुधीर इंगळे यांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवा केल्याबद्दल पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

याबरोबरच पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संभाजी नाईक, पोलिस नाईक अतुल गायकवाड यांना क्लिष्ट व थरारक बहुचर्चित गुन्ह्याची उकल करून खटले कोर्टात दाखल करण्याच्या कामासाठी, पोलिस हवालदार प्रदीप शहरे, पोलिस नाईक मंगेश चव्हाण यांना राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्रावीण्य मिळविल्याबद्दल, पोलिस नाईक विनोद साळुंखे यांना दरोडेखोरांविरुद्ध ठोस कारवाई केल्याबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले आहे.



पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झालेले अन्य विभागातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांची नावे पुढीलप्रमाणे :-

१) पुणे ग्रामीण पोलिस :

सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते, (नक्षलवादी विरोधी कारवाईमध्ये उल्लेखनीय काम),सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवा केल्याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, रमेश खूने, जितेंद्र शेवाळे, पोलिस हवालदार राजू पुणेकर, रवींद्र शिनगारे, सचिन गायकवाड, निलेश कदम, सुरेश भोई, अजित ननावरे, प्रमोद नवले, मंगेश नेवसे.

२) लोहमार्ग पोलिस पुणे :

पोलिस उपअधीक्षक नरेंद्र गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक मारुती जगझापे, पोलिस हवालदार दत्तात्रय स्वामी.

३) राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक २ :

सशस्त्र पोलिस निरीक्षक अनंत माळी, नागेश बांदेकर, सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक प्रकाश येरम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नामदेव राऊळ, सुनील यादव, पोलिस हवालदार प्रवीण तायडे.

४) गुन्हे अन्वेषण विभाग :

पोलिस निरीक्षक मनोहर हरपुडे, पोलिस हवालदार मनीषा थिटे (राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्रावीण्य), पोलिस हवालदार राजू गायकवाड, राजेंद्र मेमाणे, अनिता चुरी.

५) दहशतवाद विरोधी पथक, पुणे :

पोलिस उपअधीक्षक सुनील यादव.

६) लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे :

पोलिस हवालदार विनोद झगडे.

Post a Comment

0 Comments