मला माफ करा, मी हरलो - जितेंद्र आव्हाड...
राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
यामध्ये त्यांनी अनंत करमुसेने केल ते एकदम बरोबर केलं. माझे अर्धनग्न चित्र फेसबुकवर टाकलं. २०१७ सालच्या पोस्टमध्ये तो शरद पवार साहेबांना शरदुद्दीन म्हणतोय.
एकदम चांगल काम करत होता. सगळ्यांच्या समोर व्हिलन जितेंद्र आव्हाड. मला समजत नाही की सगळ्यांना मी एवढा का खुपतो - असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.
तसेच मी चूक काय केली ८० हजार लोकांना खिचडी वाटली. त्यांच्यासाठी दारोदारी फिरुन त्यांना शांत करणं, त्यांना तुम्ही घरी जा, घरात बसा म्हणून सांगणं, संध्याकाळी रात्री ज्या वस्तीत लोक ऐकत नाही त्यांना पोलीसांसोबत जाऊन सांगणं आणि त्यानंतर ती वस्ती शांत होणं. ही माझी चूक होती का? असंही आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, जगाला माहीत नसलेला जितेंद्र आव्हाड दाखवण्याची मला सवय ही नव्हती. पण जितेंद्र आव्हाड यांना व्हिलन दाखवण्याचं काम गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जणांनी यशस्वीरित्या करुन दाखवलं. म्हणून तुमची माफी मागतो मला माफ करा, अशा शब्दांत आव्हाडांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Post a Comment
0 Comments