रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये होणार कोरोनाग्रस्त शहरांची विभागणी...
रुग्णांच्या संख्येनुसार महाराष्ट्राची 3 झोनमध्ये विभागणी करण्यात येणार असून, केंद्र सरकारने कोरोनाचे १५ आणि त्यापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या भागाला रेड झोन म्हणून जाहीर करावे, १५ पेक्षा कमी रुग्ण असलेल्या भागाला ऑरेंज झोन म्हणून तर १ ही रुग्ण नसेल अशा भागाला ग्रीन झोन म्हणून घोषित करण्याचे सांगितले आहे.
केंद्राने काही प्रमाणात लॉकडाऊन कमी केले तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात लॉक डाऊन कमी होणे कठीण आहे.
तुमचे शहर कोणत्या झोन मध्ये?
रेड झोन - मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबाद.
ऑरेंज झोन - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, गोंदिया.
ग्रीन झोन - धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली.
याप्रमाणे सर्व जिल्ह्यांची ३ झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments