जिंती फलटण (प्रतिनिधी निकेश भिसे) – श्री जितोबा विद्यालय, जिंती येथील दहावीच्या १९९५-१९९६ बॅचचे स्नेहसंमेलन दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तब्बल ३० वर्षांनंतर वर्गमित्र आणि शिक्षक पुन्हा एकत्र आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता शाळेसमोर आणि ग्रामपंचायत हॉलसमोर आकर्षक रांगोळ्यांनी झाली.
वर्गातील सुमारे ५७ विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पारंपरिक फेटे बांधण्यात आले. कार्यक्रमस्थळी चहा-बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माजी शिक्षकांचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षकांना फेटे बांधून, मानचिन्ह व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी माजी मुख्याध्यापक मा. के. बी. चव्हाण सर यांना अध्यक्षपद देण्यात आले होते, मात्र तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते:
-
शरद रणवरे (उपसरपंच, जिंती ग्रामपंचायत)
-
मा. श्री. एस. जे. पोळ (माजी पर्यवेक्षक)
-
तसेच विविध काळातील शिक्षक: एस. बी. भराडे, व्ही. बी. शिंदे, एम. एन. पोरे, आर. जी. अवताडे, यू. एल. बागल, एम. डी. कदम, एल. एस. लोखंडे, व्ही. एम. जगदाळे, आर. एस. यादव, व्ही. एस. जगताप, सौ. के. एम. सावंत (धाईंजे मॅडम), श्री. काळोखे अण्णा व करे अण्णा
या बॅचच्या वतीने पाचवी ते दहावीच्या वर्गांसाठी लेक्चर स्टँड भेट म्हणून देण्यात आला. सौ. जाधव मॅडम (सध्याच्या मुख्याध्यापिका) आणि त्यांच्या स्टाफचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचा सन्मान केला. शाळेतील जुन्या आठवणी आणि किस्स्यांनी हॉल हास्याने भरून गेला.
दुपारी १२ ते १ या वेळेत भोजन व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमासाठीची तयारी प्रवीण रणवरे, वनिता विश्वासराव रणवरे, सुनिता जितोबा रणवरे यांनी एकत्र येऊन व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे सर्व सहशिक्षितांना जोडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संग्राम गरुड, विजय चौरे, दीपक खलाटे यांनी आर्थिक नियोजन केले, तर भोजनाचे नियोजन विजय भोसले यांनी पाहिले. अँकरिंगची जबाबदारी विश्वनाथ जाधव, विजय चौरे आणि भरती सासवड (कासार) यांनी केली.
कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम्’ने झाला. त्यानंतर सर्वांनी एकत्र फोटो काढून पुन्हा एकदा शालेय दिवसांच्या आठवणींमध्ये रमले. हे स्नेहसंमेलन ३० वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गासाठी एक अविस्मरणीय पर्व ठरले.
Post a Comment
0 Comments