कोंढवा (मुज्जम्मील शेख) — काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने कार्य करणारे शोएब खान यांची हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २७ चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
नियुक्ती झाल्यानंतर कोंढव्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचा शुभेच्छा व सत्कार केला आहे. तसेच विविध स्तरावरून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शोएब खान यांनी काँग्रेस पक्षाचे व समाजाचे कार्य सातत्याने आणि निष्ठेने केले आहे. त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले आहेत. त्यांच्या कामाची आणि कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हडपसर काँग्रेस अध्यक्ष दिलीप शंकर तुपे यांनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देत सांगितले की, “शोएब खान हे आपल्या कार्यातून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवतील व काँग्रेस पक्ष अधिक बळकट करतील, अशी अपेक्षा आहे.”
या नियुक्तीनंतर शोएब खान यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की, “सोनिया गांधी, मल्लीकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे विचार घेऊन सामान्य जनतेसाठी कार्य करणे हेच माझे ध्येय राहील.”गोर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अग्रेसर राहील असे खान यांनी सांगितले आहे.
Post a Comment
0 Comments