Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दौंडमध्ये भव्य सामाजिक उपक्रम; रक्तदान, १००० आइस्क्रीम वाटप आणि शिवमूर्तीचे विशेष आकर्षण...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दौंडमध्ये भव्य सामाजिक उपक्रम; रक्तदान, १००० आइस्क्रीम वाटप आणि शिवमूर्तीचे विशेष आकर्षण

दौंड (संघराज गायकवाड, मयुर साळवे) 
 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज दौंड शहरातील तिरंगा संविधान चौक येथे कर्तव्य प्रतिष्ठान, तिरंगा संविधान चौक मित्रपरिवार, आणि अश्वमेघ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण ५१ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या तर लहानग्यांसाठी व नागरिकांसाठी १००० हून अधिक आइस्क्रीम वाटप करण्यात आले.


कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली तिरंगा संविधान चौकात उभारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती. शिवजयंतीनिमित्त उभारलेल्या या मूर्तीसमोर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने गर्दी केली. यावेळी भाजीपाला बाजार जवळ असल्याने आणि सर्वसामान्य जनतेत उत्साह असल्याने कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमात दौंड शहर व तालुका विकास विचार मंचाचे ए.आर.जे. सर उर्फ डॉ. अभिषेक राजेश जाधव हे देखील आपल्या विद्यार्थ्यांसह उपस्थित होते. त्यांनीही रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात आशिष परकाळे, वैभव शेलार, आनंद गुंदेचा, मधु मस्के, वैभव मुळे, राकेश गायकवाड, संतोष व्हंकाडे, हरीश गायकवाड, मोंन्टी साळेकर, निरंजन पवार, रुपेश तांबे, प्रथमेश पाटील, सनी वाघमारे, प्रतीक लोंढे, शुभम चव्हाण (तिरंगा ग्रुप) आणि तिरंगा संविधान चौक मित्रपरिवार दौंड यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments