पौड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप रावांचा "महाप्रताप": प्रताप जगतपांचा "आका" कोण? माहिती अधिकारातील अर्जदारांशी उद्धट वागणूक; प्रादेशिक ते प्रादेशिक बदली झालीच कशी चौकशीची मागणी करणार - मुज्जम्मील शेख...
पुणे – पौड प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्यावर माहिती अधिकाराच्या अनुषंगाने गंभीर आरोप झाले आहेत. त्यांनी माहिती आयुक्तांना अर्ज करण्याचे सूचवले, यावरून त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
माहिती मागितल्यानंतर प्रताप जगताप यांचा प्रतिसाद असा होता की, "असे पोकळ धमक्या देऊ नका. जे करायचे ते करा." या वाक्याने त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या कर्तव्य बाजावण्यात ते असक्षम असल्यावर आणि नितीवर प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी माहिती अधिकाराच्या तरतुदींना केराची टोपली दाखवत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.
प्रताप जगताप यांची बदली शिरूर प्रादेशिक वन विभागातून पुणे प्रादेशिक वन विभागाच्या पौड वन परिक्षेत्र कार्यालय येथे झाली आहे. नियमाने प्रादेशिक विभागात वन अधिकारी एक टर्म पूर्ण झाल्यानंतर सामाजिक वनीकरण किंवा वन्य जीव विभागात रोटेशनली बदली होणे अपेक्षित आहे. तथापि, त्यांनी प्रादेशिक ते प्रादेशिक अशी बदली करून घेतली आहे, ज्यामुळे त्यांच्या मागे कोणता आका आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणाची गूढता वाढली असून, प्रताप जगताप यांना संरक्षण देणारे कोण आहे, हे जाणून घेण्याची गरज भासत आहे. यामुळे पुणे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
सर्व संबंधितांची या प्रकरणावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण हे प्रकरण फक्त वन विभागापुरते मर्यादित राहणार नाही, तर याचा व्यापक प्रभाव होऊ शकतो.
प्रताप जगताप यांची चौकशी करण्याची मागणी करणार - मुज्जम्मील शेख अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ पुणे...
या प्रकरणात हिंदी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांनी सांगितले आहे की, अधिकाऱ्यांनी अशी वागणूक देणे अतिशय चुकीचे आहे. ज्यावेळी आम्ही त्यांना पहिला फोन केला त्यावेळेस त्यांनी काही ऐकून न घेता सरळ सांगितले की, "राज्य माहिती आयोगकडे अपील दाखल करा मला काय उत्तर द्यायचे मी देतो". आणि फोन न सांगता ठेऊन दिला. दुसऱ्या फोनला आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही या प्रकरणाची बातमी लावतो तुमचं स्टेटमेंट पाहिजे. त्यावर ते म्हणाले की, "मी तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही बातमी लावा तुम्ही न्यूज मीडियाला द्या मला काही फरक पडत नाही."
असे जगताप म्हणाले मात्र असं बोलणं अधिकाऱ्यांनी शोभत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हे पूर्वी प्रादेशिक वन विभागात कार्यरत होते आणि आताही प्रादेशिक वन विभागातच बदली करून घेतली आहे. यामध्ये दुसऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचं मोठं नुकसान झालेला आहे. नेमकं यांना कोणत्या वरिष्ठ अधिकारी किंवा कोणत्या राजकीय पुढारी यांना मदत केली आहे. तसेच यांचा नेमका "आका" कोण आहे. यांची बदली प्रादेशिक ते प्रादेशिक झालीच कशी तसेच त्यांच्या गैरवर्तवणुकीबाबत चौकशीची मागणी करणार असल्याचे शेख यांनी सांगितले आहे.
क्रमशः
लवकरच भाग २
लवकरच पुणे प्रादेशिक वन विभागामध्ये तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी यांचा 4 ते साडे 4 कोटींचा नातेवाईकांच्या गुगल पे आणि फोन पे प्रकरण आणणार बाहेर? रिसॉर्टसाठी जागा घेण्याची गडबड? कोण आहे हा वनपरिक्षेत्र अधिकारी ओळखा पाहू?
Post a Comment
0 Comments