दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (सीआयएसएफ) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीआयएसएफने कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या पदांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे.
या पदासांठी भरती प्रक्रिया ५ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.cisf.gov.in/cisfeng/recruitment/ वरून अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज ३ एप्रिलपर्यंत स्विकारले जाणार आहेत. सीआयएसएफकडून जारी केलेल्या अधिसुचनेनुसार, अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा समकक्ष उत्तीर्ण असले पाहिजेत.
या भरती प्रक्रियेद्वारे ११६१ पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. याशिवाय, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल. सीआयएसएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १ ऑगस्ट २०२५ रोजी १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात माहिती साठी उमेदवारांनी अधिकृत सूचना तपासावी. या पदांसाठी उमेदवारांना १०० रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी आणि ईएसएम उमेदवारांना अर्जाच्या शुल्कात सूट देण्यात आली आहे. तसेच, अर्ज करण्यापूर्वी, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीशी संबंधित सर्व अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा, कारण जर अर्जात काही चूक आढळली तर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
Post a Comment
0 Comments