पुण्यातील 'ट्रेड शो' महोत्सवात १००० हून अधिक नवीन फूटवेअर मॉडेल्स प्रक्षेपित करण्यात आले.
पुणे, ९ फेब्रुवारी २०२५: वॉकरू या फुटवेअर ब्रँड तर्फे पुण्यात विमाननगर येथे 'ट्रेड शो २०२५' चे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेड शो मध्ये १००० हून अधिक फूटवेअर मॉडेल्स प्रक्षेपित केले. या डिझाइन्स प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांच्या जीवनशैली व प्राधान्यक्रमांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र बाजारपेठेच्या खास गरजा ओळखत वॉकरूने विविध श्रेणींमध्ये उत्पादने प्रक्षेपित केली,ज्यामध्ये वॉकरू+ आणि वॉकरू++ अर्बनोज रेंज,वॉकरू फ्लिप-फ्लॉप्झ,वॉकरू स्पोर्ट्झ अशा काही श्रेणींचा समावेश होता. वॉकरू इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक - श्री. मनोज पी. बास्टियन यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
वाकरूचे व्यवस्थापकीय संचालक श्री. व्ही. नौशाद म्हणाले , “आमचा ग्राहकांच्या कार्यक्षम गरजांची, तसेच आरामदायीपणाची खात्री घेत त्यांच्या फॅशन महत्त्वाकांक्षांची देखील पूर्तता करत महाराष्ट्रातील सर्वात पसंतीचा ब्रँड बनण्याचा मनसुबा आहे.''
वॉकरू १०,००० हून अधिक रिटेलर्सच्या नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्राहकांपर्यंत पोहोचते. वॉकरूची व्यापक श्रेणी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून ग्राहकांना उच्च दर्जाचे, फॅशनेबल व आरामदायी फूटवेअर देण्यासोबत उद्योगामध्ये अग्रस्थानी राहण्याचे ध्येय आहे,असेही ते पुढे म्हणाले.
Post a Comment
0 Comments