पुणे : कोंढवा खुर्दमध्ये श्री नवनाथ माने यांच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अभियंता अमोल पुंडे आणि उप अभियंता राजेश खाडे यांनी 4 फेब्रुवारी 2025 रोजी संपूर्ण क्षेत्राची पाहणी केली, ज्या दरम्यान एकाच व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे सापडली आहेत.
मालक श्री नवनाथ माने यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम 1966 कलम 43 आणि 52 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
कुठे कुठे सुरू आहेत अनधिकृत बांधकामे :
1. भाग्योदयनगर, स.नं. 51
2. मलिकनगर, स.नं. 46
3. शिवनेरीनगर, स.नं. 51
4. स.नं. 50, नगरसेवक फिरोज शेख यांचे ऑफिस समोर
5. स.नं. 48, साईबाबानगर
6. मिठानगर, स.नं. 51/2ब
7. स.नं. 49
संपूर्ण क्षेत्रात या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची गरज असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
अधिकारी या कारवाईबद्दल गंभीर असून, भविष्यात अशा अनधिकृत बांधकामांविरुद्ध कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देत आहेत.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम, 1966 अंतर्गत कलम 43 आणि 52 चे सारांश खालीलप्रमाणे आहे:
कलम 43:
हा कलम स्थानिक स्वराज्य संस्थांना शहरांच्या नियोजनासाठी योजना तयार करण्याची आणि त्यानुसार विकास कार्य करण्याची परवानगी देते. यामध्ये विविध क्षेत्रे, जसे की निवासी, औद्योगिक, वाणिज्यिक इत्यादी, यांचा समावेश असतो. स्थानिक शासकीय संस्थांना शहराच्या विकासासाठी आवश्यक निर्देश देण्याचे अधिकार दिलेले आहेत.
कलम 52:
हा कलम योजना तयार झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या नियम आणि प्रक्रिया सांगतो. या अंतर्गत, स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कार्याचे नियंत्रण, नियमन आणि अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत मार्गदर्शन दिले जाते.
या कलमांद्वारे शहरी विकासाच्या योजनांची रचना आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होते.
७ बांधकामांना वरदहस्त नेमकं कोण?
यामध्ये नेमका असा प्रश्न पडला आहे की सात बांधकामे होईपर्यंत प्रशासन नेमकं झोपेत होते का? किंवा यांना कोणी वरदस्त आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
Post a Comment
0 Comments