सोलापूर जिल्ह्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केलेल्या गुगल-पे, फोन-पे, बोगस वृक्ष लागवडीच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची मुख्य वनसंरक्षक वानखेडे यांनी केलेल्या चौकशी पुन्हा सुरू करण्याची हिंदी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांनी मागणी!
पुणे : पुणे प्रादेशिक वन विभागातील एक वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील गुगल पे, फोन पे व इतर माध्यमातून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. ह्या अधिकाऱ्याने यापूर्वी सोलापूरच्या बार्शी आणि पंढरपूर येथे सामाजिक वनीकरण विभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असताना या प्रकरणी संशयित कामगिरी केली होती.
गुगल पे, फोन पे, वृक्ष लागवड व इतर माध्यमातून करण्यात आलेल्या वित्तीय व्यवहारांचे बारकाईने परीक्षण श्री वानखेडे मुख्य वनसंरक्षक शिक्षण व प्रशिक्षण विभागाने केली होती. तथापि, या चौकशीची अद्याप कोणतीही ठोस परिणामकारकता दिसून आलेली नाही, आणि संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे या विभागातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामध्ये काही पैश्यांची देवाण घेवाण करून सदर प्रकरण दाबले असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी हिंदी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांनी या बाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी वनबल प्रमुख नागपूर यांच्याकडे पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करण्याची तसेच यामध्ये दोषी असलेल्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करून यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
"भ्रष्टाचाराच्या या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दोषी असलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून यांना शासकीय सेवेतून बडतर्फ कारवाई केली पाहिजे," असे शेख यांनी म्हटले आहे.
या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा सहायक वन संरक्षक यांच्यावरही धाक!
सदर वनपरिक्षेत्र अधिकारी हे अत्यंत भ्रष्टाचाराच्या पैशाने श्रीमंत झाले असून, त्यांनी यांच्या वरील असलेले अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक यांनाही आपल्या ताब्यात ठेवले असल्याचे एक स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ हाथी लागले आहे.
यामध्ये वरिष्ठ अधिकारी हे या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची पडती बाजू मांडत असल्याचे दिसून आले आहे.
वृक्ष लागवडीत ही कोट्यवधींचा अपहार
वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक ना अनेक योजना राबवल्या जात आहेत. गेल्या काही वर्षापासून 1 जुलैचे वृक्ष संवर्धन दिनाचे औचित्य साधून कोट्यावधी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते.
सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीचे बोगस कागदपत्रे सादर करुन कोट्यावधी रुपयांची बीले उचलली आहेत. या वृक्ष लागवड मोहिमेतून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे समोर आल्याने सामाजिक वनीकरण विभागाचे पंढरपूर येथील तीन अधिकारी आणि इतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकरणाबाबत असंतोष व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी वन विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण लोकांनी चांगले वनीकरण आणि पारदर्शक प्रशासन याची अपेक्षा केली आहे.
या प्रकरणात नवीन तपासणीची आवश्यकता असून, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कोणतीही चुक लपवली जाऊ नये, हे सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचे उल्लंघन आहे.
सार्वजनिक सेवेत पारदर्शकता आणि विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी हे आवश्यक आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई केली जावी. जर मनोज बारबोले यांच्यावर लावलेले आरोप सिद्ध झाले, तर यामुळे वन विभागाची प्रतिमा प्रभावित होईल आणि लोकांचा विश्वास खंडित होईल.
या सर्व घटनाक्रमामुळे वन विभागाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा याबाबत जनतेत असंतोष वाढणार आहे. न्यायाच्या या प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता ही अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून जनतेचा विश्वास पुनर्स्थापित केला जाऊ शकेल.
आता या या पुढे सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांची यांनी केलेले गैर कामे आणि कोट्यावधींचे केलेले भ्रष्टाचार बाबत सर्व माहिती आम्ही प्रसारित करणार आहोत.
कोण आहेत हे अधिकारी लवकरच आणणार समोर!
Post a Comment
0 Comments