Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, होणार अनेक मोठे निर्णय! वाचा सविस्तर

 

मुंबई: राज्यमंत्री मंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळची बैठक पार पडणार आहे.बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा वाढीव हप्तावर चर्चा करून निर्णय अपेक्षित आहे.

राज्यातील अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये कापूस ,तूर,पालेभाज्या,कांदा,फळबागा,केळी आणि द्राक्षे उत्पादकला मोठा फटका बसला आहे. पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यमंत्री मंडळच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

राज्य सरकार पुढील आठवड्यापासून अर्थसंकल्पची तयारी सुरू करणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प कसा असला पाहिजे यासाठी आजच्या मंत्रिमंडळच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकरीसाठी योजना, युवकासाठी योजना, वृद्धासाठी योजना सहित अनेक योजना सुरू ठेवण्यासाठी राज्यातील तिजोरीवर पडणार भार कसा कमी करता येईल या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शनच्या समावेश राज्यातील विकासाला गती देण्यासाठी मॉडेल तयार करण्याबाबत राज्यमंत्री मंडळच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

Post a Comment

0 Comments