Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

HMPV Virus: भारतात HMPV चा तिसरा रुग्ण, अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या मुलाला संसर्ग

 

HMPV cases in India : चीनमध्ये मोठ्या संख्येने मुलांना या व्हायरसची लागण होत आहे. रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्याचे दावे केले जात आहेत. दरम्यान, भारतातही या नवीन व्हायरसची प्रकरणे दिसू लागली आहेत.

गुजरातमधील अहमदाबाद येथील एका दोन महिन्यांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या मुलावर अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आतापर्यंत भारतात तीन रुग्ण आढळले आहेत. गुजरातव्यतीरिक्तकर्नाटक या एकाच राज्यात दोन रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात एक तीन महिन्यांची मुलगी आणि दुसरा ८ महिन्यांच्या मुलाचा यात समावेश आहे. या व्हायरसमुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही.

गुजरात सरकारच्या आरोग्य विभागाने HMPV व्हायरसबाबत विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सातत्याने वाढत असलेल्या प्रकरणांमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. देशभरात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. 

दरम्यान, HMPV सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. सर्व फ्लू नमुन्यांपैकी ०.७ टक्के HMPV चे असतात. तसेच, या व्हायरसचा स्ट्रेन काय आहे? हे अद्याप समजलेले नाही. अशा परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञांनी या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता आणि सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, लोकांना हात धुणे आणि मास्क वापरण्याचा आणि इतर खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

HMPV म्हणजे काय?

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो आणि हिवाळ्यामध्ये हे सर्वात सामान्य आहे.

Post a Comment

0 Comments