Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

Pimpri Chinchwad Police : पोलीस स्टेशनवर नागरिकांची तक्रार धुडकावण्याचा प्रकार ; पोलीस अधिकारी व कर्मचारी हप्ते वसुली करत असल्याचे श्रीरंग बारणे यांचे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप...


Pimpri Chinchwad Police : पोलीस स्टेशनवर नागरिकांची तक्रार धुडकावण्याचा प्रकार ; पोलीस 
अधिकारी व कर्मचारी हप्ते वसुली करत असल्याचे श्रीरंग बारणे यांचे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कामकाजवर गंभीर आरोप...

पिंपरी चिंचवड :- शहरातील विविध पोलीस स्टेशनवर सामान्य नागरिकांच्या तक्रारींना गाळण्यात येत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Appa Barne) यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे (CP Vinaykumar Choubhe) यांच्याकडे एक पत्र पाठवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे आणि त्यांना गंभीर स्वरूपात इशारा दिला आहे.

पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, हिंजवडी, वाकड, काळेवाडी आणि सांगवी पोलीस स्टेशनवर येथे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात असलेले सर्व पोलीस ठाण्यात अनेक नागरिक तक्रारी घेऊन गेल्यानंतर देखील त्यांची तक्रार तात्काळ दाखल केली जात नाही. उलट, तक्रार करणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.

बारणे यांनी आरोप केला आहे की, काही पोलीस अधिकारी व कर्मचारी अवैद्य धंदे यांची परवानगी देऊन व इतर पध्दतीने हप्ते वसुली करत असून, वरिष्ठांना देखील हप्ता द्यावा लागतो. लोकप्रतिनिधी म्हणून संपर्क साधल्यास, नागरिकांना नाहक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या बाबतीत संबंधित पोलीस स्टेशनची माहिती घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलकाच्या मार्गाचा विचार करावा लागेल, असे ते स्पष्टपणे सांगत आहेत.

या घटनाक्रमामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस प्रशासनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आणि नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. पोलीस प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments