Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

आंबेगाव पोलीसांची उत्तम कामगिरी ; आंबेगाव पोलीसांनी 'चुहा गँग'वर कारवाई ; मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल...

आंबेगाव पोलीसांची उत्तम कामगिरी ; आंबेगाव पोलीसांनी 'चुहा गँग'वर केली मोक्काअंतर्गत कारवाई...

पुणे :- दिनांक 23 नोव्हेंबर सोमवारी रात्री आंबेगाव पोलीस स्टेशनचे हददीत कोबिंग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधकचे अनुषंगाने गस्त करणेकामी फिर्यादी धनाजी पोपट धोत्रे, वय ३४ वर्षे, धंदा पोलीस शिपाई ८७५५, नेमणुक आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर व स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना दिनांक २४/११/२०२४ रोजी पहाटे ०४/१० वाजता डिलाईट बेकरीसमोर, संतोषनगर कात्रज पुणे याठिकाणी आरोपी नामे तौसीफ जमीर सय्यद उर्फ चुहा वय-२८ वर्षे रा. जामा मस्जीद जवळ, संतोषनगर, कात्रज पुणे यास पुणे शहर कार्यक्षेत्रामधुन दोन वर्षाकरीता हद्दपार केले असताना तौसिफ उर्फ चुहा जमीर सय्यद व त्याचे साथीदार यांनी पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्रतिबंधात्मक शस्त्रबंदी आदेश असताना आपले कब्जात एक गावठी बनावटीचा पिस्टल, एक जिवंत काडतुस व १५ ग्रॅम मॅफेड्रॉन, एक कोयता, डिजीटल वजन काटा, सुतळी, स्क्रू ड्रायव्हर सह मिळुन आल्याने तौसिफ उर्फ चुहा जमीर सय्यद व इतर ०४ साथीदारांविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ९९७/२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम २२ (क), २९, भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३१०(४), २२३, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.

कारवाई दरम्यान यातील आरोपी नामे १) तौसीफ जमीर सय्यद उर्फ चुहा वय-२८ वर्षे रा. जामा मस्जीद जवळ, संतोषनगर, कात्रज पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी सदस्य आरोपी नामे २) सुरज राजेंद्र जाधव वय- ३५ वर्षे धंदा-व्यवसाय रा. रुपचंद तालीमसमोर, मंगळवार पेठ, ता करमाळा, जि सोलापुर ३) मार्कस डेव्हिड इसार वय-२९ वर्षे धंदा-नोकरी रा.लेन नं.५, रघुनंदन अपार्टमेन्ट, फ्लॅट नं.४, मुसळे यांचेकडे भाडयाने, चैतन्य गगनगीरी मंगल कार्यालयाचे पाठिमागे, धानोरी पुणे ४) कुणाल कमलेश जाधव वय-२५ वर्षे धंदा-नोकरी रा.प्रसाद रेसीडेन्सी, फ्लॅट नं.डी-११, पवन स्विट होम शेजारी, सोमनाथ नगर, वडगाव शेरी पुणे यांना अटक करण्यात आली असुन ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

सदर टोळी प्रमुख तौसिफ उर्फ चुहा जमीर सय्यद याने त्याचे सह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात अतिशय चाणाक्षपणे प्रत्येक गुन्हा करतेवेळी जाणिवपुर्वक वेगवेगळे साथीदार घेवुन स्वतःचे नेतृत्वाखाली संघटीतरित्या टोळी तयार करुन गंभिर स्वरुपाचे गुन्हे केलेले असुन त्यांनी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने व आर्थिक फायदयासाठी अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा प्रयत्न, घातक शस्त्राने दरोडा, अग्नीशस्त्र बेकायदेशिररीत्या जवळ बाळगणे, मारामारी, दहशत माजविणे, या सारखे गंभिर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. तसेच कोंढवा, कात्रज, संतोषनगर, मार्केटयार्ड व पुणे शहरात अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करुन आर्थिक फायद्यासाठी अनेक तरुण मुलांना व्यसनाधीन करुन प्रसंगी त्यांना गुन्हेगारी टोळीमध्ये सामिल करुन गुन्हेगारी संघटना वाढविण्याचे काम करत आहे. त्यांचेवर अनेकवेळा प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

तरी यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने व आर्थिक फायदयासाठी सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आलेने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन. १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(२), ३ (४) प्रमाणेचा अंतर्भाव करणेकामी आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी मा.पो.उप-आयुक्त परि-२, पुणे शहर, स्मार्तना पाटील यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, प्रविण पाटील यांना सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करुन वरील आरोपी यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गु.र.नं. ९९७/२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम २२ (क), २९, भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३१० (४), २२३, आर्म अॅक्ट कलम ३ (२५),४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे या गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन. १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर प्रविण पाटील यांनी दि.२०/१२/२०२४ रोजी मान्यता दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगीरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परि-२, पुणे शहर, राहुल आवारे सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलीस स्टेशन, मोहन कळमकर पोलीस उप-निरीक्षक व स.पो. फौजदार चंद्रकांत माने, स.पो. फौजदार शैलेंद्र साठे, पो. हवा. ७४२१ ढमढेरे, पोहवा ७७७३ मासाळ, पोना ६७९३ जमदाडे, पोशि ८१३८ सावंत पोशि ८७५५ धोत्रे, पोशि ९११८ भोसले, पोशि ७७८ जगदाळे, यांचे पथकाने केली व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील पो. हवा.६५१२ विशाल वारुळे, पो. अंमलदार ४९५५ स्वप्नील बांदल यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments